कमलाभवानी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपण उत्साहात संपन्न*

आज दि 21 रोजी कमलाभवानी साखर कारखान्याचा आठवा बॉयलर प्रदीपन  सोहळा, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन मा.श्री वामन(दादा) बदे यांच्या हस्ते व मा श्री. चंद्रहास (बापू) निमगिरे (माजी सभापती करमाळा पंचायत समिती) यांचे अध्यक्षतेखाली पार पडला.

कमलाभवानी कारखान्याचे चेअरमन मा. श्री. विक्रमसिंह (दादा) शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे म्हणून भाषण करताना सुजित (तात्या) बागल, मा. श्री. राजेंद्र बारकुंड,मा. श्री चंद्रहास बापू यांनी आपले मनोगत व्यक्त करुन कारखान्याच्या गाळप हंगामास शुभेच्छा दिल्या.

कारखान्याचे चेअरमन मा.श्री विक्रमसिंह (दादा)शिंदे यांनी साखर एक्सपोर्ट करण्यामध्ये अडचण आल्यामुळे आपणास शेतकऱ्यांचे पेमेंट देण्यास उशीर झाल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली. परंतु यावर्षी आपण जिल्ह्यातील कारखान्याबरोबर भाव देणार असल्याचे त्यांनी बोलून दाखवले त्याचप्रमाणे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या जवळपास भाव देऊ असे सांगून मागील गळीत हंगामातील ऊसाचे पेमेंट ३१ जानेवारी पर्यंतचे २३०० रु व १ फेब्रुवारी पासूनचे पुढील पेमेंट जाहीर केलेल्या वाढीव शंभर रुपये अनुदानासह २४०० रु प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्याला जमा केल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे आपण दीपावलीसाठी आणखी शंभर रुपयाचा हप्ता काढणार असल्याचे सांगितले व पुढील गाळप हंगामात आपण प्रत्येक दहा दिवसाला ऊसाचे पेमेंट काढणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले तरी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व  शेतकऱ्यांनी कारखान्यास ऊस देऊन  सहकार्य करावे असे आव्हान देखील त्यांनी शेतकऱ्यांना केले. दुष्काळी परिस्थितीमुळे कारखानाअडचणीत असून यावर मात करण्यासाठी पुढील काळामध्ये आपण रिफायनरी प्रोजेक्ट व डिस्टिलरी चा प्रोजेक्ट टाकणार असल्याचे त्यांनी सांगितले पुढील काळामध्ये कमलाभवानी साखर कारखाना हा प्रगतीपथावर जाऊन काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

कारखान्याचे जनरल मॅनेजर भोसले साहेब यांनी प्रास्ताविक करताना मागील वर्षीचा कारखान्याचा अहवाल सर्वांसमोर मांडला त्यामध्ये हंगाम 22- 23 मध्ये कारखाना ११४ दिवस चालला असून ५,८४,४४५ मॅट्रिक टन ऊसाचे गाळप केले व त्यापासून ५,१८,७०० क्विंटल साखर निर्मिती केली व तसेच त्याचबरोबर 55760930 युनिट वीज उत्पादन केल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र बारकुंड, भास्कर (अण्णा )भांगे नानासाहेब निळ (सर), सुजित (तात्या) बागल, शहाजी झिंजाडे, तात्या (मामा) सरडे, विनय ननवरे, मानसिंग (भैया) खंडागळे, अनिल पवार, अश्पाक जमादार, बलभीम जाधव, धनंजय शिंदे, संजय आरकिले, बंडू माने, लक्ष्मण सरडे, पत्रकार अश्पाक सय्यद ,दस्तगीर अशोक मुरूमकर, विशाल घोलप, समाधान भोगे आदी उपस्थित होते

कारखान्याचे जनरल मॅनेजर भोसले आर डी. डेप्युटी जनरल मॅनेजर क्षिरसागर आर.एस.असिस्टंट जनरल मॅनेजर (प्रोसेस )पाटील, चीफ इंजिनियर गायकवाड, अकौंटचे उबाळे, मुख्य शेती अधिकारी जगदाळे, शेती अधिकारी पाटील,प्रशासकीय अधिकारी जगताप, एच.आर. मॅनेजर विघ्ने,सिव्हिल इंजिनिअर मुलाणी,टोणपे,खरेदी अधिकारी कोयले,स्टोअरचे सय्यद, इलेक्ट्रिक इंजिनिअर सावंत, डेप्युटी चीफ केमिस्ट जाधव,सुरक्षा अधिकारी धनके, ई डी पी  विभाग प्रमुख शिंदे, डेप्युटी चिफ इंजिनियर बनकर आदी कार्यक्रमास उपस्थित होते व त्यांनी हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मोलाचे योगदान दिले शेवटी मुख्यशेती अधिकारी जगदाळे साहेब यांनी सर्व पाहुण्यांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता केली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *