आरेवाडी येथे दसरा मेळाव्याला करमाळा तालुक्यातील सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे- सरपंच लक्ष्मी सरवदे

सांगली जिल्ह्यातील कवठेमहाकाळ तालुक्यातील आरेवाडी येथे दिनांक २२ ऑक्टोबर २०२३ रोजी बहुजन नेते तथा विधान परिषद सदस्य आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या

मेळाव्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आदर्श सरपंच लक्ष्मी संजय सरवदे यांनी केले आहे. लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा स्थळ आरेवाडी तालुका कवठेमहाकाळ जिल्हा सांगली येथे होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व समाज बांधव या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून सर्व

आपल्या करमाळा तालुक्यातील महिला भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने आरेवाडी बनात यायचे आहे असे आवाहन सरपंच लक्ष्मी संजय सरवदे यांनी केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *