
करमाळा प्रतिनिधी
भाजपचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस तथा सोलापूर डीपीडीसी सदस्य गणेश (भाऊ) चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकास्तरीय भव्य सांप्रदायिक भजन व शास्त्रीय गायन स्पर्धेचे आयोजन २२/१०/२३ ते २३/१०/२३ रोजी केले आहे. या

स्पर्धेचे आयोजन श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेची सुरवात भजनसम्राट ह.भ.प. बापूराव बागल महाराज झरे यांच्या महामंत्राने होईल. सामुदाईक भजन स्पर्धा व वैयक्तिक भजन अशी दोन विभागात ही स्पर्धा आयोजित

केली आहे. सामुदाईक भजन स्पर्धा यामध्ये प्रथम परितोषिक ५१०० रु., द्वितीय पारितोषिक ४१०० रु., तृतीय पारितोषिक ३१०० रु., तर उत्तेजनार्थ बक्षीस २१०० रु. आहे. वैयक्तिक भजन स्पर्धेत प्रथम पारितोषिक ३१००रु., द्वितीय पारितोषिक २१०० रु., तृतीय पारितोषिक ११०० रु. तर उत्तेजनार्थ बक्षीस ५०१ रु. आहे. याशिवाय दोन्ही स्पर्धेत भाग घेऊन पारितोषिक मिळवणाऱ्या स्पर्धकास स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व एक भारतीय झाडाचे रोप भेट देण्यात येणार आहे. तसेच या स्पर्धेचे लाईव्ह प्रसारण संताचे संगती या यु-ट्यूब चॅनेलवर करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य आहे. तसेच श्रीदत्त मंदिर करमाळा, कॉटेज हॉस्पिटल समोर याठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन ह.भ.प. रामभाऊ निंबाळकर महाराज, ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली झोळ महाराज, ह.भ.प. विठ्ठल पाटील महाराज व अॅड. बाबुराव हिरडे यांचे शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, नायब तहसीलदार विजयकुमार जाधव यासह करमाळा तालुक्यातील अनेक नामांकित महाराज उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेत भाग घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी भजनी मंडळानी ह.भ.प. ढेरे महाराज (वीट), ह.भ.प. विजय खंडागळे गुरुजी, नानासाहेब पठाडे (पोथरे), सचिन गटकूळ, नितीन कानगुडे यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन भाजपा सोशल मीडिया संयोजक नितीन झिंजाडे यांनी केले आहे.