शिवसेना करमाळा विधानसभा संपर्क प्रमुख पदी रवि आमले

करमाळा प्रतिनिधी

दिनांक 17 /10/ 2023 रोजी बाळासाहेब भवन, मंत्रालय, मुंबई येथे वंदनीय हिंदू सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या विधानसभा संपर्कप्रमुख (कार्यक्षेत्र – सोलापूर जिल्ह्यातील – करमाळा विधानसभा) या पदी रवी दशरथ आमले यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी येथे संजयजी मोरे (शिवसेनेचे सचिव), खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे प्रवक्ते – भारत

गोगावले, शिक्षण मंत्री – दीपक केसरकर, शिवसेनेचे प्रवक्ते – नरेश मस्के, आमदार-रवींद्र फाटक, ठाणे परिवहन सभापती – अनिल भोर, पंढरपूरचे जिल्हाप्रमुख – महेश साठे व माढा लोकसभेचे संपर्कप्रमुख – सुभाष साळुंखे आदी उपस्थित होते.

रवी दशरथ आंबे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात गेले २० ते २२ वर्षापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाचे काम करत आहेत. तसेच प्रत्येक आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग असतो. दिघे काही वर्षे प्रत्यक्ष सहवास लाभला असून त्यांच्यासोबत काम केलेली आहेत. तसेच आजतागायत पक्षामार्फत त्यांना मिळालेल्या सर्व जबाबदारीचे पालन

योग्यपणे प्रामाणिकरित्या आणि कोणताही स्वार्थ न ठेवता पार पडलेल्या आहेत. त्याप्रमाणे खासदार राहुल शेवाळे यांच्या ते सोलापूर जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख असताना त्यांच्यासोबत काम केले असल्याने सदर विधानसभा करमाळा तालुक्याचे स्थानिक नागरिक असल्याने तसेच त्यांना जास्तीत जास्त माहिती असल्याने त्याचा नक्कीच उपयोग पक्षाला होईल. आजतागायत त्यांनी केलेल्या संपूर्ण कामाचा विचार करून त्यांचेवर सदर पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *