करमाळा प्रतिनिधी 

मी कानाड गल्ली, करमाळा ता. करमाळा, जि. सोलापूर येथील कायमचा रहिवासी आहे. कानाड गल्ली येथे सिमेंट काँक्रिटीकरण्याचे काम मंजूर आहे. सदरील कामाची निविदा होऊन बरेच दिवस होऊन गेलेले आहेत व निविदीचे संपूर्ण प्रक्रिया सुद्धा पूर्ण झालेली आहे. असे असताना गेले दीड ते दोन वर्ष होऊन गेले तरी देखील सदरील काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आलेले नाही. गेल्या काही दिवसाखाली सदर ठिकाणी पाईपलाईनचे कामासाठी खोदsकाम करण्यात आलेले होते. त्यामुळे सदरील ठिकाणच्या रस्त्याचे अत्यंत दुर्दशा झालेली आहे. रस्त्यावर चालताना खोदकामामुळे झालेल्या मातीच्या ढिगारांवरून जीव मुठीत घेऊन नागरिकांना येजा करावी लागते. सदरील रस्ता अत्यंत खराब झाल्यामुळे त्या ठिकाणी अनेक वेळा लहान मुले व वयोवृद्ध नागरिक पडलेले आहेत. तरी सदर खराब रस्त्यामुळे नागरिकांच्या जीवितास हानी झाल्यास त्याला जबाबदार कोण ?

तरी आपण कानाड गल्ली, करमाळा येथे प्रत्यक्ष येऊन रस्त्याचे पाहणी करावी व सदरील रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्यात आदेश संबंधित ठेकेदारास द्यावेत व नागरिकांची खराब रस्त्यामुळे होणाऱ्या त्रासातून सुटका करावी.

तसेच सदरील निवेदनाचा कालावधीची माहिती व इस्टीमेटची एक प्रत मला मिळावी.

सदरील निवेदन मुख्याधिकारी करमाळा यांना देण्यात आलेली आहे. 

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *