आयुष्याच्या  वाटेतला प्रत्येक दगड ठेचाळून ठेचाळून  इतका गुळगुळीत केलाय की, अडथळा आणणारा  एकही दगड वाटेत दिसत नाही  पहिल्यासारखा. आता उरला नाही पाहायला ही खडबडीत,

अनकुचीदार ओबडधोबड दगड. दारिद्र्याच्या भट्टीत तावून सुलाखून पाय अगदी  मजबूत झालाय,शुद्ध पोलादासारखा. नाही उरली भीती आता पावलांना ठेचाळण्याची, रक्ताळण्याची की वेदनांनी विव्हळण्याची कारण, त्याच्या दृष्टीने  जगात कोणताच दगड असा उरला नाही ज्याच्या घाताणे जगण्यावर परिणाम होईल. म्हणून आता प्रत्येक लहान मोठा दगड मला  गुळगुळीत वाटू लागलाय.  नदीत सापडणाऱ्या गोट्यांसारखा.

कवी – दादासाहेब 

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *