चिखलठाण कुगाव रस्त्यासाठी गावकरी करणार आत्मदहन
करमाळा प्रतिनिधी
चिखलठाण कुगाव रस्त्याचे काम गेल्या अनेक महिने पासून रखडले आहे ते काम तातडीने चालू करावे अन्यथा 13 ऑक्टोबर रोजी आत्मदहन करण्यात येईल असा इशारा चिखलठाण येथील अविनाश सरडे,योगेश सरडे व कोगाव येथील सचिन गावडे, शंकर बोंद्रे यांनी दिला आहे.
याबाबत तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, चिखलठाण कोगाव रस्त्याचे काम चालू करण्याबाबत व रस्ता चांगल्या दर्जाचा करण्यासाठी आम्ही 29 ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता यावेळी कामाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर चर्चा करून रस्त्याचे काम इस्टिमेट प्रमाणे करण्याचे आश्वासन दिले होते व काम तातडीने चालू करण्याचे सांगितले होते त्यामुळे आम्ही उपोषण स्थगित केले होते त्यानंतर मात्र सदरचे काम आठ दिवस चालू ठेवले व नंतर आतापर्यंत काम बंद ठेवले आहे हे काम चालू करण्याबाबत आम्ही समक्ष व फोनद्वारे सांगितले तरीही कामास प्रत्यक्ष सुरूवात केलेली नाही.त्यामुळे आम्ही नावीलाजास्तव 13 ऑक्टोबर रोजी आत्मदहन करणार आहोत त्यानंतर होणाऱ्या परिणामास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा त्यांनी दिला आहे

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *