
करमाळा प्रतिनिधी
करमाळा आगारातून करमाळा ते आदमापूर (बाळूमामांचे स्थान) नवी एस. टी. बस सेवा सुरू केल्याबद्दल, धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष संजय (बापू) घोलप यांच्या पुढाकाराने व बाळूमामा भक्तांच्या उपस्थितीत एस. टी. महामंडळाचे डेपो मॅनेजर प्रमोद शिंदे यांचा फेटा, शाल व गुच्छ देऊन कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला.

या निर्णयामुळे आदमापूर येथे जाणाऱ्या बाळूमामांच्या सर्व भक्तांची व प्रवाशांची मोठी सोय झाली असून परिसरातील नागरिकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे..