
करमाळा प्रतिनिधी
कृष्णाजी नगर येथील रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी भाजपा राज्य परिषदेचे सदस्य बाळासाहेब कुंभार यांनी केली आहे.

करमाळा शहराच्या हद्दीतील कृष्णाजी नगर येथील रस्ते खूप खराब झाले आहे. तेथील रस्ते नगरपरिषदेने खोदून ठेवल्यामुळे गटारीचे पाणी नळाला येत आहे. ते रस्ते तसेच खोदून ठेवले आहे. पुन्हा दुरुस्त केले नाही. तरी या भागात पाऊस पडल्याने

खूप मोठा चिखल होत आहे. तेथील रहिवासी वयोवृद्ध, नागरिक, छोटे मुले ये जा करत आहे. लहान मुले सायकल वरून पडत आहे. येथे खूप मोठी समस्या झाली आहे. तरी त्वरित करमाळा नगरपरिषद अधिकारी कर्मचाऱ्यांनी या रस्त्याची दुरुस्ती

करावी अशी मागणी येथील रहिवासी यांनी केली आहे अशी माहिती भाजपा राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार यांनी दिली आहे.