करमाळा प्रतिनिधी
आदिनाथ सहकारी साखर कारखान्यांमधील प्रलंबित कामे मार्गी लावणे व कर्मचाऱ्यांच्या पगारी करणे, हंगामातील वाहतूक वाहन मालकांचे मागील देणे देणे यासाठी सहा कोटी रुपये जयवंत मल्टीस्टेट पतसंस्थेतून मंजूर करण्यात आले असून या पुढील काळाची आदिनाथ ला पैसा कमी पडू देणार नाही अशी ग्वाही शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी दिली.

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची लिलाव प्रक्रिया थांबवण्यासाठी आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजी सावंत यांनी 12 कोटी रुपयांची मदत केलेली आहे
या मदतीमुळे आदिनाथ चे खाजगीकरण थांबून हा शेतकऱ्यांच्याच मालकीचा कारखाना राहिला आहे. चालू गळीत हंगाम सुरू करण्यासाठी केलेल्या आर्थिक मदतीची उतराई म्हणून आज आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे प्रशासकीय मंडळ बाळासाहेब बेंद्रे, महेश चिवटे व संजय गुटाळ प्राध्यापक शिवाजीराव सावंत व युवा नेते पृथ्वीराज भैय्या सावंत यांचा सत्कार केला.

यानंतर प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी आदिनाथच्या प्रगतीचा आढावा संचालक मंडळाकडून घेतला.
यावेळी बोलताना प्राध्यापक शिवाजीराव सावंत म्हणाले की, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा येणारा गळीत हंगाम किमान चार लाख उसाचे गाळप करून झाला पाहिजे अशा पद्धतीने नियोजन करा. कर्मचाऱ्यांचे वेळेवर पगार देणे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काटा पेमेंट देणे, ऊस वाहतूकदारांना बोनस सह वाहतुकीचे पैसे रोखीने द्यावे असे नियोजन करावे, कारखान्याचा डिझेल पंप तात्काळ सुरू करा, उजनी धरणातून नवीन पाईपलाईन करा, अत्यंत कमी खर्चात मशिनरी दुरुस्तीचे कामे करा, गाळपासाठी लागणाऱ्या सर्व शासकीय परवानगी चे सर्व पत्र पूर्ण करा अशा सूचना प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी दिल्या.
######
राजकुमार घाडगे कर्मचारी संघटना अध्यक्ष
वेळेवर कर्मचाऱ्यांच्या पगारी होत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना आनंदाचे वातावरण असून ऊस वाहतूकदारांची जुनी पेमेंट देण्याचे निर्णय संचालक मंडळ घेतल्यामुळे या हंगामात चार लाख गाळप करण्यासाठी तरी सज्ज असून कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.