भा.ज.पा.मध्ये निष्ठेला निश्चितच फळ आहे – घोरपडे

करमाळा प्रतिनिधी

भा.ज.पा.मध्ये निष्ठेला निश्चितच फळ आहे. प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला पक्ष योग्य वेळी न्याय देतो असे मत करमाळा हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष संजय अण्णा घोरपडे यांनी व्यक्त केले. ते भा.ज.पा. जिल्हा चिटणीस श्याम सिंधी यांच्या नियुक्तीनंतर सत्कार करताना बोलत होते.

यावेळी राष्ट्रीय समाज पार्टी सोलापूर जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, घारगाव सरपंच प्रतिनिधी संजय सरवदे, भीमदल जिल्हाध्यक्ष सुनील भोसले, संजय गांधी निराधार योजनेचे नरेंद्रसिंह ठाकुर, भा.ज.पा. शहर उपाध्यक्ष कपिल मंडलिक ,विलास मिरगळ आदी मान्यवर उपस्थित होते..

घोरपडे पुढे म्हणाले की सिंधी यांनी पक्षाशी प्रामाणिकपणे राहुन गेली अनेक वर्षापासून कार्य केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊनच वरिष्ठांनी त्यांना जिल्हाचिटणीस ही महत्त्वाची जबाबदारी दिली. तसं सिंधी यांचा पिंड कार्यकर्त्याचा परंतु जो

कार्यकर्ता पक्षाच्या विचारधारेशी प्रामाणिक राहतो त्याला पक्ष नेहमी मोठी संधी देण्याचा प्रयत्न करतो. या संघटनात्मक प्रक्रियेमध्ये त्यांनी सर्वसामान्य, वंचित, शेतकरी, शेतमजूर यांंना न्याय द्यावा तसेच पक्षाची विचारधारा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. सद्यस्थितीमध्ये राज्यात व केंद्रामध्ये भा.ज.पा.चे सरकार आहे याचा विचार करून प्रलंबित प्रकल्प कसे मार्गी लागतील यासाठी वरिष्ठांच्या संपर्कातून त्याचा पाठपुरावा करून ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहावे. यासाठी आम्हीही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. असा आत्मविश्वास घोरपडे यांनी दिला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *