चारा व पाणी टंचाई अहवालात करमाळा तालुक्यातील वाडी वस्त्यांचा समावेश करावा – मा. आ. नारायण पाटील

करमाळा प्रतिनिधी

चारा व पाणी टंचाई अहवालात करमाळा तालुक्यातील वाडी वस्त्यांचा समावेश करून सुधारीत माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावी, अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी महसूल विभागाकडे केली आहे. याबाबत

अधिक सविस्तपणे बोलताना पाटील यांनी सांगितले की सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गावे व वाडी वस्ती या बाबतची आकडेवारी जिल्हाधिकारी कार्यालय यांचे मार्फत प्रसिद्ध करण्यात आली. सांगोला, पंढरपूर, माळशिरस आदेश अन्य तालुक्यात पाणी व चारा टंचाई निर्माण होऊ शकतील अशा गावांची तसेच वाडी वस्तीची संख्या दाखवली गेली आहे. करमाळा तालुक्यात मात्र चारा व पाणी टंचाई निर्माण होईल अशी गावे दाखवली गेली आहेत. यात वाडी व वस्ती यांचा समावेश दिसून येत नाही. वास्तविक पाहता करमाळा तालुक्यात शेती करण्यास सोपे जावे म्हणून वाडी वस्तीवर राहणाऱ्या लोकांची संख्या

अधिक आहेत. तालुक्यात शेकडो वस्त्या असून किमान दीडशे हून अधिक लोकसंख्या असलेल्या सर्वात जास्त वस्त्या आहेत. या वाडी वस्तीवर पशू धन मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे वाडी वस्तींचा समावेश संभाव्य चारा व पाणी टंचाई आराखड्यात होणे अत्यंत आवश्यक आहे. भविष्यात या संकटाचे निवारण करताना चारा डेपो, पाण्यासाठी टँकर आदींचा वापर करताना आराखड्यात समावेश असल्यास याचा लाभ सदर वस्त्यांना होऊ शकेल. तरी आपण परत एकदा वाडी वस्तीची संख्या प्राप्त करून यातील संभाव्य चारा व पाणी टंचाई निर्माण होतील अशा वस्त्याचा या अहवालात समावेश करावा व सदर फर अहवाल

जिल्हाधिकारी तथा वरिष्ठ कार्यालयाकडे नव्याने सादर करावा अशी मागणी आपण एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांचेकडे केली असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *