
शहरात,ग्रामीण भागात गणरायाचे जंगी स्वागत
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरात व तालुक्यातील गावागावात गणरायाचे जंगी स्वागत करण्यात आले आहे.

लहान मोठे मंडळांनी आप आपल्या गल्लीत गावत गणरायाची प्रतिष्ठापणा केली
आहे मूर्तिकाराच्या दुकाना पासून बँड पथकाच्या तालावर युवकांनी मिरवणूक
काढत गुलालाची उधळण करत आपापल्या गल्लीत गणरायाची प्रतिष्ठापणा केली
होती.ग्रामीण भागात काही ठिकाणी लेझीम झांज पथकाच्या तालावर युवकांनी
मिरवणूक काढत प्रतिष्ठापणा केली होती सर्वत्र ऊत्साही वातावरण
होते.यावेळी शहरातील सर्व रस्ते गजबजले होते गणरायाचे विविध साहित्य
खरीदी करण्यासाठी घरातील महिला मंडळ तसेच लहान मोठे नागरिक मुलांनी गर्दी
केली होती.यावेळी करमाळा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.