
करमाळा प्रतिनिधी
चिखलठाण येथील इरा पब्लिक स्कूलच्या वतीने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी पर्यावरण जागृतीसाठी इरा च्या विद्यार्थ्यानी मातीपासून इको फ्रेंडली गणेशमुर्ती बनविल्या आहेत.

पर्यावरण जागृती व प्रदूषणाच्या दुष्परिणामाची जाणीव विद्यार्थ्याना व्हावी यासाठी चिखलठाण येथील इरा पब्लिक स्कूलमध्ये इको फ्रेंडली गणेशमुर्ती बनविण्याची एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. पारंपारिक गणेश मूर्तीत प्लॅस्टर ऑफ

पॅरिस व केमिकल चा उपयोग असतो. यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. ब्रिजेश बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यशाळेत जल प्रदूषण व वायू प्रदूषणला आळा घालण्यासाठी कोणत्याही केमिकलचा वापर न करता शेतातल्या काळ्या भोर मातीने या गणेश मुर्ती बनवण्यात आल्या. या वेळी नर्सरी ते इयत्ता 4 थी च्या सर्व विद्यार्थ्यानी व शिक्षकानी सहभाग नोंदविला.
