समाजाच्या आरक्षणासाठी रॅली  काढण्यात येवून चोंडी येथे जाऊन पाठींबा व्यक्त करण्यात आला.

करमाळा प्रतिनिधी  

धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणी साठी चोंडी ता.जामखेड येथे उपोषणास बसलेल्या उपोषण

कर्त्याना पाठींबा देण्यासाठी करमाळा तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात येवून चोंडी येथे जाऊन पाठींबा व्यक्त करण्यात आला. चोंडी येथे गेल्या बारा दिवसापासून आण्णासाहेब रुपनवर पाटील (माळशिरस) व सुरेश बंडगर (परभणी ) हे दोघे उपोषणास बसलेले आहेत. त्यांची तब्येत बिघडली असून रूपनवर पाटील यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरेश बंडगर हे ही अत्यवस्थ आहेत. असे असताना शासन अद्याप ही मूग गिळून गप्प बसले आहे . याचा संताप संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर बांधवा मधे आहे. राज्यात याचे तीव्र पडसाद उमटत असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळी  आंदोलने सुरू आहे. राज्याच्या विविध भागातून धनगर बांधवासह इतर समाजघटकांडून, विविध सामाजिक संघटनांकडून चोंडी येथे जाऊन पाठींबा देत आहेत.

करमाळा तालुका सकल धनगर समाजानेही रविवारी शेकडो मोटारसायकलची भव्य रॅली काढून चोंडीत जाऊन शासनाचा निषेध करीत आपला पाठींबा जाहीर केला.

या रेलीत करमाळा सकल धनगर समाजाचे नेते, करमाळा बाजार समितीचे सभापती प्रा.शिवाजी बंडगर, आदिनाथचे माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, प्रा.अर्जुन सरक, पंचायत समितीचे माजी सभापती अतुल पाटील, माजी सदस्य विलास पाटील, डाॅक्टर अशोक शेळके, अंगद देवकते, अण्णा सूपनवर,  दादा कोकरे, पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर, आदिनाथचे माजी संचालक विठ्ठल शिंदे आदी उपस्थित होते.

माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या वतीने शंभूराजे जगताप यांनी पाठींबा दिला. रॅली करमाळा दत्त मंदिर, तहसील कार्यालय, मार्गे करमाळा शहरातील महापुरुषांना पुष्पहार घालून मांगी मार्ग चोंडीत पोहोचली.

चोंडीत उपोषणास बसलेल्या सुरेश बंडगर यानी पाठींबा स्वीकारला.

प्रा. बंडगर यानी धनगर समाज आरक्षण अंमलबजावणीत बाबत  मनोगत व्यक्त केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *