करमाळा पोलिस स्टेशन समोरील हाँटेल दत्तप्रसाद मध्ये चोरी

करमाळा प्रतिनिधी

करमाळा पोलीस स्टेशन समोरील असणारे हॉटेल दत्तप्रसाद मधील बाकड्यांची चोरी झाली आहे. हॉटेलचे मालक बाळासाहेब पवार यांनी माहिती दिली आहे की, गेले तीस वर्षापासून हे हॉटेल येथे आहे अद्याप पर्यंत केव्हाही चोरी झाली नव्हती. परंतु

काल रात्रीच्या सुमारास हॉटेलमधील दहा हजार किमतीचे लोखंडी बाकडे चोरीला गेले आहेत. याबाबत करमाळा पोलीस स्टेशन अधिकारी कर्मचाऱ्यांना भेटलो असता ते पाहू, दाखल करू, बघू असेच म्हणत आहे. करमाळा पोलीस स्टेशनच्या आवारातच

दखल घेतली जात नाही तर तालुक्यातील घटने बाबत कशी दखल घेत असतील. हा एक मोठा प्रश्न आहे असे मालक बाळासाहेब पवार यांनी सांगितले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *