विश्वकर्मा समुदायाने प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा लाभ घ्यावा-विजयकुमार नागवडे किसान मोर्चा ता. अध्यक्ष

करमाळा प्रतिनिधी

आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील विश्वकर्मा वंशीय समाजासाठी शिल्पकार, सोनार, सुतार, लोहार, चांभार,

कुंभार, वस्तू निर्मिती कारागीर या सर्व समाजासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा शुभारंभ दिनांक १७/९/२०२३ रोजी केला आहे. तरी या योजनेमधून तीन लाख रुपये ५ % वार्षिक व्याजदराने लोन मिळणार आहे. त्यापैकी प्रथम एक लाख रुपये व नंतर दोन लाख रुपये असे एकूण तीन लाख रुपये लोन मिळणार आहे. देशांमध्ये विश्वकर्मा वंशीय

समाज फार मोठ्या प्रमाणात आहे. पंतप्रधान मोदींनी विश्वकर्मा समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजाला स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी त्यांचा औद्योगिक विकास व्हावा यासाठी सदर योजनेचा शुभारंभ केला  आहे. तरी मी विजयकुमार उत्तम नागवडे करमाळा तालुक्यातील विश्वकर्मा वंशीय समाजाला आव्हाहन  करतो की, आपण सर्वांनी संघटित व्हावे व या

चांगल्या योजनेचा लाभ घेऊन आपला व्यवसाय वाढवावा. सदर योजनेचा फॉर्म सेतू कार्यालय किंवा सीएससी सेंटर मधून ऑनलाइन भरावा तेथून आपणास सर्व माहिती उपलब्ध होईल. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना विजय नागवडे यांनी

विश्वकर्मा समुदायाचे राज्य तथा राष्ट्र व्यापी संघटन करण्याचा संकल्प बोलून दाखवला करमाळा तालुक्यातील विश्वकर्मा घटकांना फॉर्मभरताना अडचण आल्यास  ८५३०१४०७४० या नंबर वरील फोन करावा असे आव्हान त्यांनी केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *