करमाळा प्रतिनिधी

करमाळा शहरासह तालुक्यातील बलुतेदार, शेतकरी, कामगार अन् गोरगरीब जनतेची सेवा आपण आपल्या राजकिय अन् सामाजिक वाटचालीत करत आलेलो आहे. आपण आपल्या हातात हात देऊन सोबत या कोणाचे पाय धरायची गरज पडणार

नाही असे प्रतिपादन मा.आ. जयवंतराव जगताप यांनी परप्रांतिय कामगार प्रश्नी निर्माण झालेला नाभिक बांधवांचा तिढा सोडवताना केले. नुकेतच शहरातील एका सलून दुकाना मध्ये परप्रांतिय कामगार आणल्याने स्थानिक नाभिक समाज अन्

संबंधित सलुन चालक यांच्यात वादावादी होवून तणाव निर्माण झाला होता. याबाबत नाभिक संघटना व दुकान मालक यांचे वतीने मा.आ. जयवंतराव जगताप यांनी सहकार्य करावे असे आवाहन करणारे निवेदन दिले होते. त्यानंतर त्यांनी नाभिक

समाज बांधवांची बैठक बोलावून हा प्रश्न सोडवला. सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया चालु आहे तरी सुद्धा आवर्जून वेळ देत संघटनेच्या याबाबत झालेल्या बैठकीत सामान्यांचे प्रश्न सोडवणे आपले कर्तव्य समजून तात्काळ हा

तिढा सोडवला. या बाबत कृतज्ञता म्हणून नाभिक संघटनेच्या वतीने मा.आ. जयवंतराव जगताप यांचा सत्कार करण्यास संघटनेचे पदाधिकारी आले होते. परंतु महत्वाच्या बैठकी मूळे त्यांना सत्कार स्विकारता आला नाही. त्यामूळे युवा नेते शंभूराजे जगताप यांनी हा सत्कार स्विकारला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व नाभिक समाज बांधव उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *