करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथे आयुष्यमान भव मोहिमे अंतर्गत लाभार्थ्यांचे आरोग्य तपासणी व आभा कार्ड काढणे शिबीर ग्रामपंचायतच्या वतीने आज संपन्न झाले. या शिबिराचे उद्गाटण वाशिंबे गावाचे सरपंच तानाजी (बापू) झोळ यांच्या

शुभहस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी या आयुष्यमान भव मोहिमे अंतर्गत आयुष्यमान भारत योजनेची माहीती उपस्थित ग्रामस्थांना दिली. यावेळी ते म्हणाले की, या आयुष्यमान भारत योजनेतर्गत 5 लक्षपर्यंतचे उपचार केंद्र सरकार मोफत

करणार आहे. याचा लाभ आपल्या गावातील गरजूनी घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रम प्रसंगी उपसरपंच अमोल पवार, माजी सरपंच प्रताप झोळ,बापूसाहेब गाडे,नामदेव बोबडे, आदाम शेख, प्रदीप राऊत, अमोल भोंग,रमेश सपकाळ, उद्दव बोबडे, आरोग्य सेवक उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *