मराठा क्रांती मोर्चाचे नेते महेश भैय्या डोंगरे पाटील यांचा ब्रहानपुर येथे 27 ऑगस्टला होणार सत्कार

मुबंई प्रतिनिधी 

राष्ट्रीय मराठा सेवा संघ पा प्रणित मराठा वस्तीगृह कक्ष, तानुबाई बिर्जे पत्रकार परिषद यांच्या वतीने शिवराज्यिषेक दिनाच्या निमित्तानं मराठा क्रांती मोर्चाचे नेते महेश भैय्या डोंगरे पाटील यांचा बऱ्हाणपूर मध्यप्रदेश येथे दिनांक 27 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चा देशभर निघाला होता.

यातीलच एक नेतृत्व जनतेच्या समोर आले.

ते म्हणजे युवा नेतृत्व महेश भैय्या डोंगरे पाटील होय. राज्यभर सामाजिक उपक्रम राबविले जातात.याच कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

मराठा आरक्षण मिळावं म्हणून गावोगावी त्यांनी बैठका घेऊन संघटन उभे केले आहे. कोविड लॉकडाउनच्या काळात सुद्धा सोलापूर मध्ये भव्य असा मराठा आरक्षणासाठी मोर्चा त्यांनी काढला होता.

गेले तीन वर्षापासून ते सिंदखेड राजा जिजाऊ जयंती निमित्त येणाऱ्या सर्व शिवभक्तांना चहा पाणी नाश्त्याचे वाटप करत चार स्टॉल लावून करत असतात.

तसेच ६ जूनला शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त येणाऱ्या सर्व शिवभक्तांना चहा पाणी नाश्त्याची ते व्यवस्था करत आहेत.

 दरवर्षी  किल्ला रायगड येथे मांसाहेब जिजाऊंच्या जयंतीनिमित्त येणाऱ्या सर्व जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांसाठी त्यांनी जेवणाची व्यवस्था असो किंवा .आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांना एक लाख चिवडा पाकिट गेले 18 वर्षापासून सुरू आहे.

 मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा क्रांती ठोक मोर्चा याच्यामध्ये सक्रिय राहून पूर्णपणे मराठा समाजाला समर्पित होऊन त्यांनी अनेक समाज उपयोगी काम केलेले  आहे.

राज्यातील 58 मूक मोर्चा मधील जवळपास 40 मोर्चेमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.

तुळजापूर येथे ठोक मोर्चाची सुरुवात त्यांनी प्रथम केली. त्यानंतर परळी येथे 22 दिवस ठोक मोर्चाच्या आंदोलनात ते बसून होते, त्यानंतर परत तुळजापूर येथे आई जगदंबेच्या दारात जागर मोर्चा त्यांनी केला.

 राज्य सरकारला जागी झाले पाहिजे म्हणून मराठा आरक्षणावर पंढरपूर ते मंत्रालय मराठा आक्रोश मोर्चा पायी दिंडी त्यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली होती.

त्यानंतर मराठा समाजाचे छोटे-मोठे आंदोलन कायम त्यानी केलेले आहेत.मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या दरम्यान मराठा आरक्षणासाठी जे 42 बांधव शहीद झाले त्या प्रत्येक बांधवांना एक एक लाख रुपयाची मदत मिळवून देणे व राज्य सरकारकडून दहा लाख रुपये व एसटी महामंडळात नोकरीसाठी पाठपुरावा करून मी सर्वांना नोकरी व आर्थिक मदत मिळवून दिलेली आहेत.

आझाद मैदान येथे अकरा दिवस आमरण उपोषण केलेले आहे. मराठा आरक्षण व मराठा आरक्षण दरम्यान 42 बांधव शहीद झाले. त्यांच्यासाठी महाराष्ट्र मध्ये मराठा समाजातील युवकांना आरोग्य विषय मुख्यमंत्री सहाय्या निधी मधून व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून हॉस्पिटलची रोज 50 ते 60 लोकांना मदत ते करत असतात. गोरगरीब लोकांना मोफत कपडे वाटप करणे,असा त्यांचा उपक्रम असतो. महाराष्ट्रामध्ये किमान आत्तापर्यंत त्यांनी दहा ते वीस हजार लोकांना मोफत कपडे वाटप केलेले आहे.

पुण्यामध्ये मराठा समाजाचे गरीब यूपीएससी, एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक त्यांनी दिले व विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांना व उपमुख्यमंत्री यांना निवेदन देऊन पाठपुरावा करण्याचे काम ते करत असतात.

 शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विषयावर ते काम करत आहेत. महाराष्ट्रामध्ये पुन्हा ॲट्रॉसिटी झाली त्या संदर्भात व महाराष्ट्र मध्ये मराठा समाजातील आणि अधिकारी व समाजातील लोकं कुठं अन्याय अत्याचार झाला तर ते धावून जातात.

 आतापर्यंत त्यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांना किमान तीन ते चार लाख वह्या व हजारो वृक्षारोपण त्यानी केलेले आहेत.

इतिहासात पहिल्यांदाच छत्रपती संभाजी महाराजांची जयंती गेट ऑफ इंडिया येथे आयोजन करून तेथील रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

मुख्यमंत्री आरोग्य सहायता निधी मधून महाराष्ट्र मध्ये अनेक मराठा समाजातील लोकांना एक लाखापासून ते तीन लाखापर्यंत अनेक असे निधी त्यांनी मिळवून दिलेला आहे.

रोहा जि.रायगड तांबडी बुद्रुक येथे कोपर्डी सारखे घटना घडली होती. तिथे लॉकडाऊनमध्ये त्यांनी आवाज उठवला आणि तिथे भव्य मोठा मोर्चा काढून त्याही कुटुंबाला न्याय देण्यासाठी यशस्वी प्रयत्न त्यांनी केले आणि तेथील आरोपींच्या विरोधात फास्टट्रॅक कोर्टामध्ये राज्य सरकारला भाग पाडला आणि विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती केली आणि त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी युवा नेतृत्व महेश डोंगरे यांनी प्रयत्न केला आहे.

अशा प्रकारे बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे महेश दादा डोंगरे यांना मध्यप्रदेश राज्यातील बऱ्हाणपूर  येथे 27 ऑगस्टला राष्ट्रीय मराठा सेवा संघ पा प्रणित मराठा वस्तीगृह कक्ष, तानुबाई बिर्जे पत्रकार परिषद तर्फ आयोजित राज्याभिषेक सोहळ्या निमित्त गौरवण्यात येत आहे.

त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *