
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील पाथुर्डी येथे पारंपरिक अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची हलगी वाजवत पाथुर्डी गावातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीदरम्यान शंभर किलो भंडाऱ्याची उधळण करण्यात आली.

यावेळी पत्रकार शितलकुमार मोटे, शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष धनंजय मोटे, माजी सरपंच बाळासाहेब मोटे, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक चांगदेव मोटे, शिवाजी पाडुळे, विलास खरात, गंगाधर खरात, केरा माने, दिनेश लौढें,

सदाशिव तोडेकर उपस्थित होते. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन माने, खंडू माने, मिलिंद खरात, अण्णा माने, गोविंद खरात, बबलू माने, आकाश लौढें, भैय्या माने, समाधान खरात आदींनी विशेष परिश्रम घेतले.


