करमाळा प्रतिनिधी

करमाळा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष, तथा जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जयवंतराव जगताप यांनी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून करमाळा तालुक्यातील उस्मानाबाद जिल्ह्याच्या सिमेवर असलेले करमाळा तालुक्यातील

दिलमेश्वर गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जाऊन गरजु विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सील या शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यावेळी उपस्थित मान्यवरांना, गावकऱ्यांना व विद्यार्थ्यांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी

बोलताना ते म्हणाले की, तालुक्याच्या शेवटच्या टोकाचे जिल्हा सरहद्दी वरच्या गावातील गरीब होतकरु विद्यार्थ्यांनी शिक्षण घेवून यशस्वी होवून भविष्यात गावाचे नाव करावे. खरे रत्न हे ग्रामीण भागात असतात. त्यांना पैलू पाडण्याचे काम गुरुजनांचे

असून पालकांनी आपल्या पाल्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. आज गरजू विद्यार्थ्यांना शालेपयोगी साहित्य वाटताना आनंद वाटतो आहे असे ते म्हणाले. ग्रामीण भाग असो वा दूर्गम भाग असो सर्वांना शिक्षण घेण्याचा हक्क आहे परंतू आर्थिक

परिस्थीती नाजूक असेल तर कित्येक प्रज्ञावंत विद्यार्थी शिक्षणा पासून वंचीत राहतात म्हणून एक मदतीचा हात म्हणून आपण शालेय साहित्य वाटप करत आहोत असे ते यावेळी विचार व्यक्त करताना बोलले. या कार्यक्रमा वेळी कोकाटे सर,

कोल्हे मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी मल्लाव, रमेश बिरंगळ, माजी सरपंच विलास मारकड, ग्रामपंचायत सदस्य युनूस पठाण, दत्तू मस्के, ज्येष्ठ नागरिक शिवाजी राक्षे, जीवन पिसाळ, अभी राक्षे, माऊली मोरे, संजय भोज, विशाल पाटील, अक्षय घाडगे, इत्यादी नागरिक उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *