
करमाळा प्रतिनिधी
आज 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त कै.साधनाबाई नामदेवराव जगताप प्राथमिक मुलींची शाळा नं.१ न. प. करमाळा या शाळेचा ध्वजारोहण कार्यक्रम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमृतसिंग परदेशी यांच्या हस्ते संपन्न

झाला. राष्ट्रगीत, ध्वजगीत, महाराष्ट्रगीत इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी कार्तिकी सुरवसे हिने हार्मोनियम वाजवून उत्कृष्ट गायीले व तिला ढोलवर साथ दिली. शाळेचे शिक्षक रमेश नामदे सर व सर्व विद्यार्थिनींनी, कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन

समिती उपाध्यक्षा भाग्यश्री फंड, सदस्या रसिका मोरे, गौरव कांबळे, जयेश पवार सर व बहुसंख्येने पालक उपस्थित होते. सर्व मान्यवर व पालकांचे स्वागत मुख्याध्यापक दयानंद चौधरी सर यांनी केले. स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेने स्वातंत्र्य रॅली

काढली रॅलीतील थोर महापुरुषांच्या वेशभूषेतील विद्यार्थिनी व युनिफॉर्म मधील 325 विद्यार्थिनी सर्व शिक्षक,पालक सहभागी झाले होते रॅलीने शहरातील सर्व नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या स्वातंत्र्य रॅलीचा नगरपरिषद येथील ध्वजारोहण

कार्यक्रमानंतर समारोप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या शिंदे मॅडम यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार मोनिका चौधरी मॅडम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भालचंद्र निमगिरे सर, निलेश धर्माधिकारी सर, सुवर्णा वेळापुरे मॅडम, सुनीता क्षीरसागर मॅडम, तृप्ती बेडकुते मॅडम, भाग्यश्री पिसे मॅडम यांनी परिश्रम घेतले.
