करमाळा प्रतिनिधी

येथील विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा येथे विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील व कनिष्ठ महाविद्यालयाचे

उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक यांच्या मार्गदर्शनातून व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील इयत्ता 11 वी व 12 वी कला / वाणिज्य व विज्ञान वर्गातील 410 मुलींना

महाराष्ट्र राज्य अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेचे पास वाटप करण्यात आले. यावेळी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक व एस.टी. आगारातील लिपिक रेश्मा शेख (पठाण) यांच्या हस्ते काही

विद्यार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपामध्ये पासाचे वाटप केले आले. यावेळी रेश्मा शेख (पठाण) यांचा सन्मान महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी रेश्मा शेख (पठाण) यांनी महाविद्यालयातील इयत्ता 11 वी व 12 वी मुलींना

एस.टी.पासाबाबतचे वेगवेगळे नियम सांगून पासाचे महत्व सांगितले. या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वय प्रा. लक्ष्मण राख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. हनुमंत भोंग यांनी केले तर आभार डॉ.हरिदास बोडके यांनी मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *