करमाळा तालुक्यातील शासनमान्य ग्रंथालयासीठी उद्या कार्यशाळेचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील शासनमान्य सार्वजनिक वाचनालयासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशानुसार जिल्हा ग्रंथालय

अधिकारी सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली “ग्रंथालय अनुदान व्यवस्थापन प्रणाली” विषयक ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळा यश कल्याणी सेवाभावी संस्था पुणे रोड करमाळा येथे 23 /07/2023 रोजी सकाळी ठीक 9:00 वाजता आयोजित करण्यात आलेले आहे ऑनलाइन कार्यशाळेस सोलापूर जिल्हा ग्रंथालय

अधिकारी संतोष जाधव, तांत्रिक अधिकारी प्रमोद पाटील, ग्रंथालय निरीक्षक प्रदीप गाडे,यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत या कार्यशाळेत तालुक्यातील सर्व ग्रंथालयातील ग्रंथपाल, एक पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे. ही कार्यशाळा वेळेवर सुरू होणार असून येताना ग्रंथपालांनी वाचनालयाचे शिक्के व अहवाल बरोबर आणावा. प्रत्येक ग्रंथालयांनी कार्यशाळेत उपस्थित राहणे अनिवार्य आहे,असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *