करमाळा तालुक्यातील आरोग्य सेवा मजबूत होणार… 2 प्राथमिक आरोग्य केंद्रांसह 5 उपकेंद्रांच्या पद निर्मितीला मान्यता – आ. संजयमामा शिंदे
करमाळा प्रतिनिधी
ग्रामीण भागातील आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी करमाळा – माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये जिंती व म्हैसगाव या 2 ठिकाणी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बांधकाम पूर्ण झालेले होते ,तसेच वडशिवणे, उमरड, सावडी, पोफळज व गुळसडी या ठिकाणी उपकेंद्रांचे काम पूर्णत्वास गेलेले होते.सदर गावांच्या ठिकाणी आरोग्य सेवा देण्यासाठी शासनाकडून पदभरती

करण्यात आलेली नव्हती. महाराष्ट्र शासनाने या उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी पद निर्मितीला आज मान्यता दिलेली असून लवकरच बाह्ययंत्रणेद्वारे पद भरती होऊन ही आरोग्य केंद्रे सुरू होतील, त्यामुळे करमाळा मतदारसंघाची आरोग्य सेवा आता मजबूत होईल असा विश्वास आमदार संजयमामा शिंदे यांनी व्यक्त केला.


याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, सोलापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असल्यापासून आपण करमाळा मतदार संघातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर ती निधी दिलेला होता .सदर निधीमधून प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र यांच्या इमारतींचे बांधकाम पूर्णत्वास गेले, परंतु प्रत्यक्षात पदभरती झालेली नसल्यामुळे या इमारती पडून होत्या . मतदार संघातील 2 प्राथमिक आरोग्य केंद्र व 5 उपकेंद्रांमध्ये पदभरती व्हावी यासंदर्भात पाठपुरावा

केला. त्याला यश आले असून आरोग्य उपकेंद्रांमध्ये आरोग्य कार्यकर्ता, सहाय्यक परिचारिका व अंशकालीन स्त्री परिचर अशी 3 पदे भरली जाणार असून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी गट अ, वैद्यकीय अधिकारी गट ब ,आरोग्य सहाय्यक( पुरुष) गट क ,आरोग्य सहाय्यक (स्त्री )गट क, सहाय्यक परिचारिका अशी 5 पदे भरली जाणार आहेत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *