करमाळा-(प्रतिनिधी)

करमाळा तहसील कार्यालय आवारात व शहर परिसरात सुरू असलेल्या सर्व सेतू व महा ई-सेवा केंद्राचे चालक हे ग्राहकांकडून मनमानी पध्दतीने आकारणी करून ग्राहकांची लूट करत आहेत त्यांचेवर तसेच ज्या सेतू,महा ई-सेवा चालकांकडे करमाळा

तहसील कार्यालय आवारात तसेच शहरात केंद्र चालविण्याचे परवाने नाहीत त्यांचेविरुद्ध त्वरित कडक कारवाई करण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार, मकाईचे माजी संचालक विवेक येवले यांनी केली आहे.

यासंदर्भात तहसीलदार करमाळा यांचेकडे केलेल्या तक्रारीमध्ये येवले यांनी म्हंटले आहे की,या सर्व केंद्राचालकांना केंद्राच्या दर्शनी भागात ठळक अक्षरात दरपत्रक लावण्याचे ताबडतोब बंधनकारक करावे व आकारलेल्या रकमेची ग्राहकांना पावती

देण्यात यावी तसेच दरपत्रकानुसार आकारणी केली जाते का याची प्रशासनाकडून वरचेवर पाहणी केली जावी अशी मागणी केली आहे तसेच यासंदर्भात कोणाची काही तक्रार असल्यास आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन येवले यांनी केले आहे.

त्वरित कारवाई करणार : प्रभारी तहसीलदार जाधव

श्री.येवले यांनी ग्राहकांच्या वतीने केलेल्या या तक्रारीची गांभिर्याने दखल घेण्यात आली असून पुढील दोन दिवसात शहर व तालुक्यातील सर्व सेतू,ई-सेवा,आपले सरकार या सर्व केंद्रांची तपासणी पथकामार्फत पाहणी केली जाईल,सर्व केंद्रांवर दर्शनी भागात ठळक अक्षरात दरपत्रक लावण्याबाबत त्वरित कार्यवाही केली जाईल आणि नियमबाह्य पद्धतीने ग्राहकांकडून

आकारणी करणाऱ्या तसेच नियम-अटींचे पालन न करणाऱ्या केंद्राचालकांचे परवाने रद्द करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे तातडीने अहवाल पाठविण्यात येतील अशी माहिती प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव यांनी दिली असून येथून पुढे याबाबतीत तक्रारी असतील तर विद्यार्थी व ग्राहकांनी आपल्याशी समक्ष संपर्क साधावा असे आवाहन जाधव यांनी केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *