माढा लोकसभा मिशन २०२४ साठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जनस्वराज यात्रेचे पंढरपूरातून शेकडो गाड्यांसह सुरूवात

करमाळा प्रतिनिधी

माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जन स्वाराज्य यात्रेचे आयोजन दिनांक १० जुलै रोजी वार सोमवार सकाळी ८ वा. श्री.विठ्ठल रखुमाई च्या चरणी नतमस्तक होऊन पंढरपूर पासून यात्रेचा प्रारंभ होनार आहे. राष्टीय

समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन नायक,माजी मंत्री, आमदार महादेवराव जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली माढा लोकसभा मिशन २०२४ अंतर्गत जन स्वराज यात्रेला सुरूवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात पंढरपूर तालुक्यातून सुरुवात

होऊन दि.१० आणि दि.११ या दोन दिवसाची असणार आहे. पंढरपूर-माढा-करमाळा- माळशिरस-सांगोला-माण, खटाव आणि फलटण तालुक्यातील प्रमुख गावा-गावातून ही यात्रा जानार आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातून

250पेक्षा जास्त चारचाकी गाड्यांच्या ताफ्यात ही रॅली जाणार आहे. ११ जुलै रोजी करमाळा तालुक्यातील वरकूटे येथे दूपारी 1वाजता या यात्रेचे जंगी स्वागत करुन आळसुंदे, सालसे, फिसरे,  अर्जुनगर फाटा, पांडे,  दत्त मंदिर रोड,  तहसील रोड ते

महात्मा फुले यांना अभिवादन करून शहरातील  सर्व महापूरूषांना वंदन करून जेऊर, कंदर मार्गे जाणार आहे. आशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते व तालुका अध्यक्ष जीवन होगले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले

आहे.  पुढे बोलताना म्हणाले की, माढा लोकसभा हा आमचा बालेकिल्ला आहे. येणाऱ्या लोकसभेतून महादेव जानकर साहेबांना आम्हाला दिल्लीलाच पाठवायचे आहे. माढा मतदारसंघातील वंचित घटकांतील जनतेशी आणि शेतकरऱ्यांच्या आडी-अडचणी

शी संवाद साधणार आहेत. ही यात्रा भव्य दिव्य पध्दतीने पार पडण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या तालुक्यात जोरदार रॅलीचे स्वागताची तयारी केली आहे. आणि शेवटी यात्रा सांगता दिवशी सायंकाळी ५ वाजता माजी मंत्री, बहुजन नायक, आमदार महादेवराव जानकर यांची फलटण येथे जाहीर सभा होणार आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या मिशन २०२४ अंतर्गत माढा लोकसभा मतदारसंघात जनतेने जनतेसाठी आणि जनतेद्वारे सुरू केलेल्या जन स्वराज यात्रेत प्रचंड संख्येने सहभागी होवून सहकार्य करावे असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष जीवन होगले यांनी केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *