
“गावं तिथे शाखा गावं तिथे कार्यकर्ता उद्देशासह वंचित बहुजन युवा आघाडीचे शाखा उद्घाटन”
करमाळा प्रतिनिधी
वंचित बहुजन युवा आघाडी सोलापूर जिल्हा (माढा लोकसभा) माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर या ठिकाणी वंचित बहुजन युवा आघाडी शाखेचे नामफलक उद्घाटन करण्यात आले. बहुजन सम्राट अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली साहेबांची महाराष्ट्र राज्यतील झंझावात पाहुण साहेबांनी वंचित समूहाला सत्तेवर सरकार मध्ये सहभागी करून घेण्यासाठी

चाललेली कसोटी जिद्दीने पार पडताना दिसत आहे. सत्ताधारी पक्ष व विरोधीपक्ष यांना जिवाला धडकी भरवत वंचित बहुजन आघाडीत कार्यकर्ते सामील करून घेत आहे. हे पोटतिडकीने सांगत असताना त्या लोकांच्या आमिषाला बळी न जाता वंचित बहुजन आघाडीचे ग्रामपंचायत ते आमदार खासदार उमेदवार उभे करून सत्ता केंद्रीय बनवून शासन कर्ती वंचित घटकांना न्याय देण्यासाठी अहोरात्र ऊन वारा पाऊस काही न बघता वाटेल त्या ठिकाणी अन्याय अत्याचार होईल तिथे जाऊन पीडित कुटुंबाला न्याय देण्याचे काम स्वतः बाळासाहेब करत आहेत. ज्या समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर कोणी

वालीच नव्हता. जे होते ते ताटली बाटली साठी समाजात विकृती निर्माण करून आपापल्या घरी जाऊन त्यांना सत्तेतील पुढाऱ्यांचे तळवे चाटत बसुन पैशाने विकत जावुन समाजाचे नुकसान केले. अशा परिस्थितीत आपण असताना आपले काय होणार म्हणत होतो. पण आता समाज जागृती करून अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची मूठ बांधुन सर्व समाजाला बरोबर घेऊन राजकारण करत आहेत. हे सर्व पाहून वंचित बहुजन युवा आघाडी सोलापूर जिल्हा अध्यक्ष साहेबराव वाघमारे व जिल्हा महासचिव नितीन सरवदे, जिल्हा कोषाध्यक्ष विद्यमान सरपंच अभिमान जगताप, माजी

जिल्हाध्यक्ष गोपाळ काका घार्गे-देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली काल दि.30,6,2023 रोजी माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर येथील नागरिकांना पक्षात प्रवेश करून घेत. नामफलक वंचित बहुजन युवा आघाडीचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आपापल्या भाषणांमधून प्रबोधन करत पक्ष बळकट करण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी तालुका अध्यक्ष. दर्शन सुरवसे, तालुका महासचिव नव नियुक्त विकास नलावडे, उपजिल्हा अध्यक्ष, विकास कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष

पांडुरंग केंगार, रणजित गायकवाड, टेंभुर्णी शहर अध्यक्ष गणेश खरात, गणेश लोंढे, अण्णा वाघमारे, अमर तांदळे, सागर लांडगे, नियुक्त पदाधिकारी पंच क्रोशीतील सर्वजण बाळासाहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रेम करणारे आंबेडकर प्रेम फुले शाहू शिव आंबेडकर विचार धारेचे मतदार, शेकडो लोक उपस्थित होते. गावातील जनतेचे आभार जिल्हा अध्यक्ष साहेबराव वाघमारे,

अभिमान जगताप, गोपाळ घार्गे-देशमुख, नितीन सरवदे यांनी मानले. नव नियुक्ती करण्यात आलेल्या सर्व पदाधिकारी यांना पुढील कार्यास भरपूर शुभेच्छा दिल्या. गावं तिथे शाखा गावं तिथे कार्यकर्ता या उद्देशाने जिल्हा युवा पदाधिकारी काम करत आहे.
