
मद्द धुंद शिक्षकाची बदली करावी – सरपंच मारकड
करमाळा प्रतिनिधी
महारुद्र बाबा ढाकणे यांची बदली करावी अन्यथा उपोषण करणार असल्याचे निवेदन मा. गटविकास अधिकारी

पंचायत समिती, करमाळा यांना सरपंच पूजा मोहन मारकड व विहाळ ग्रामस्थांनी दिले आहे
आता व पुर्वीच्या पण निवेदनात म्हंटले आहे की जि. प. प्रा. शाळा नाळेवस्ती येथील शिक्षक महारुद्र बाबा ढाकणे हे शाळेत येताना दारू पिऊन येणे, तंबाखू खाणे, टेबलवर पाय ठेवून वर्गात बसणे, अध्यापन न करणे, शाळेत येताना नेहमी उशिरा येणे अशा प्रकारचे गैरवर्तन करत असतात. यापूर्वी याबाबत आम्ही तीन ते चार वेळा गटशिक्षण अधिकारी करमाळा यांना कळविले

होते. त्यांच्या वर्गाचे कामकाज व गुणवत्ता चांगली नसल्याने पालकांनी त्यांना अध्यापनास येण्यास विरोध दर्शविला आहे. वेळोवेळी तक्रार करूनही या शिक्षकांमध्ये कसलाही बदल दिसून येत नाही. उन्हाळी सुट्टीनंतर शाळा भरल्यानंतर कसलीही शाळापूर्व तयारी दिसून आली नाही. स्वच्छता दिसून आली नाही. तसेच पहिल्याच दिवशी वेळेत न येणे, शालेय पोषण आहार

नोंद न ठेवणे, गणवेश वाटप न करणे, शाळेत मुलांना न शिकवणे इत्यादी बाबत वेळोवेळी तक्रार करूनही शिक्षकांवर कार्यवाही होत नसल्याने आम्ही संपूर्ण नाळे वस्ती व विहाळ ग्रामस्थ पालक शाळेतला कुलूप लावत आहोत व जोपर्यंत आम्हाला शिक्षक बदलून मिळत नाही तोपर्यंत कुलूप न उघडण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. तरी आम्हास लवकरात लवकर शिक्षक बदलून

द्यावा व आमच्या मुलांचे होणारे नुकसान टाळावे असे सांगत सरपंच म्ह णाल्या सदरील शिक्षक 15 जून या दिवसापासून आजतागायत शाळेवर हजर नाही मद्द धुंद अवस्थेत हा शिक्षक १५ जून या दिवशी शाळेमध्ये उपस्थित झाला होता परंतु गावकऱ्यांनी त्याची अवस्था पाहून त्याला शाळेतून हाकलून दिले परंतु प्रशासनाने आजतागायत 18 दिवस उलटले तरी

त्याच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही असे सरपंच पूजा मोहन मारकड यांनी सांगितले आहे.