नंदन प्रतिष्ठान,श्रीराम नवमी उत्सव समिती आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा

करमाळा प्रतिनिधी

योग आहे आरोग्यासाठी क्रांती,नियमित योगामुळे जीवनात येथे सुख-शांती..आरोग्यम् धनसंपदा

करो योग,रहो निरोग संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. त्याअनुषंगाने, संपूर्ण देशात एकाच वेळी आतंरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येतो.व्यक्तीच्या शारीरिक आणि आध्यात्मिक विकासासाठी योग विद्या सहाय्यभूत आहे.आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून आज ,संताजी नगर येथे योग दिन साजरा करण्यात आले.

डॉ.अशोक शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिबिराची सुरुवात करण्यात आली.

यावेळी प्रामुख्याने शिबिराला भाजपा तालुका सरचिटणीस अमरजित साळुंखे,भाजपा डॉक्टर सेलचे डॉ.सतीश गोयेकर,अर्बन बँकेचे प्रकाश क्षिरसागर,संजय गांधी योजनेचे नरेंद्र ठाकूर, ॲड.राकेश देशमुख, ॲड.प्रियाल आगरवाल,उद्योजक अजित

सोलंकी,अभिजित वाशिंबेकर,आकाश चिवटे,रोहित कोळेकर,निलेश माने,प्रकाश परदेशी,संजय जमदाडे,दिपक देवकर,रोहित कोळेकर,तिरुपती ठोंबरे, सोनु डूकळे यांच्या सह मोठ्या संख्येने युवक वर्ग या योग शिबिराला उपस्थित होता.

या शिबिराला योग शिक्षक म्हणून पतंजली योग समिती चे तालुका प्रभारी गुरुवर्य बाळासाहेब नरारे सर यांनी मार्गदर्शन केले.

या वेळी नंदन प्रतिष्ठान चे अध्यक्ष तथा भाजपा व्यापार आघाडी चे शहराध्यक्ष जितेश कटारिया यांनी उपस्थितांचे आभार मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *