
कोळगाव धरणातून वारीच्या नावाखाली पाणी सोडल्यास तीव्र आंदोलन केले जाईल – अध्यक्ष सतीश नीळ
करमाळा प्रतिनिधी
सीना कोळगाव धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सतीश नीळ पाटील यांनी कार्यकारी अभियंता, धाराशिव पाटबंधारे विभाग धाराशिव क्र. १ यांना सीना कोळगाव धरणातून वारीच्या नावाखाली पाणी सोडल्यास तीव्र आंदोलन केले जाईल. याची नोंद

घ्यावी याबाबत चे निवेदन दिले आहे म्हंटले आहे की, सीना कोळगाव प्रकल्पा मध्ये आज रोजी अत्यअल्प प्रमाणात पाणी साठा आहे, व पाणी पातळी डेड स्टॉक मध्ये आहे. तसेच आम्ही धरणग्रस्त बांधवांनी आमची घरे, दारे जमीन जुमला सर्व काही

धरणासाठी देऊन आम्ही धरणग्रस्त बांधवांनी त्याग केला आहे. यावर्षी अजून ही पाऊस पडला नाही म्हणून आमची उभी पिके अगोदरच जळून गेली आहेत, पाणी पातळी खाली गेल्या मुळे आम्हाला वारंवार केबल, पाईप, सातत्याने वाढवावे लागेल

आहेत. तोच खर्च आम्हाला न झेपणारा झालेला आहे. आमच्या करमाळा तालुक्यातील मिरगव्हाण, हिवरे, हिसरे, कोळगाव, निमगाव (ह) आवाटी व परंडा तालुक्यातील डोंजा, कौडगाव व परिसरातील सर्व शेतकरी अगोदरच मेटाकुटीला आला आहे.

आपण आमचा अंत पाहू नये.व विनाकारण कोणी तरी वारीच्या नावाखाली पाणी मागत असेल तर ते आम्ही धरणग्रस्त शेतकरी सहन करणार नाही. कृपया आपण पाणी सोडल्यास आम्हा धरणग्रस्त संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल व

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आपणच जबाबदार आहात याची नोंद घ्यावी असे सतीश नीळ पाटील अध्यक्ष सीना कोळगाव धरणग्रस्त संघटना यांनी म्हंटले आहे, माहिती साठी प्रतकार्यकारी अभियंता सीना कोळगाव प्रकल्प विभाग परंडा, पोलीस निरीक्षकपो. स्टे. परंडा., पोलीस निरीक्षकपो. स्टे.करमाळा.