
प्राध्यापक रामदास झोळ फाउंडेशन व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रावगाव येथे पिण्याच्या पाण्याचे टँकरचे नियोजन
करमाळा प्रतिनिधी
पिण्याच्या पाण्याची अडचण करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागात जाणवत आहे. आवश्यक त्या ठिकाणी प्राध्यापक रामदास झोळ फाउंडेशन व स्वाभिमानी शेतकरी संघटना असे संयुक्त विद्यमाने पिण्याच्या पाण्याचे टँकरचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आली आहे. याचा शुभारंभ आज चार वाजता रावगाव येथुन करण्यात येणार आहे. प्रा. रामदास झोळ व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे उपस्थित राहणार आहे.




