
प्रत्येक बुथवर शिवदूत नेमणूक करा-श्रीकांत गोसावी
करमाळा प्रतिनिधी
करमाळा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात व प्रत्येक बुथवर पाच शिव दुताची नेमणूक करून शासन आपल्या दारीची योजना पोचवा असे आव्हान शिवसेना शासकीय योजना समितीचे अध्यक्ष श्रीकांत गोसावी यांनी व्यक्त केले.

श्रीकांत गोसावी यांचे उपस्थितीत शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील, प्रमुख देवानंद बागल,सेनेचे जिल्हा समन्वयक निखिल दादा चांदगुडे , प्रमुख संजय शीलवंत उपतालुकाप्रमुख सतीश रुपनर, उपतालुकाप्रमुख दादासाहेब थोरात,

महिला आघाडीच्या नेत्या ज्योतीताई शिंदे, तालुकाप्रमुख प्रियंका ताई गायकवाड, शहर प्रमुख विशाल गायकवाड, तालुकाप्रमुख राहुल कानगुडे, उपशहर प्रमुख नागेश गुरव, राजेंद्र काळे, हिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

करमाळा तालुक्यातील 118 गावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व प्राध्यापक तानाजीराव सावंत यांच्या विषयी प्रामाणिक असलेल्या पाच कार्यकर्त्यांची शिवदूत म्हणून नेमणूक करण्यात येणार असून यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न

सोडवणार आहेत. ज्यांना एकनाथ शिंदे मंत्री तानाजीराव सावंत यांचे विचाराने काम करायचे आहे. अशा कार्यकर्त्यांनी शिवसेना कार्यालयाशी संपर्क साधावा असे आव्हान महेश चिवटे यांनी केले आहे.
