
मकाईची वाहने माजी सत्ताधारी संचालकांसाठी वापरू नये – मा. संचालक सुभाष शिंदे
करमाळा प्रतिनिधी
मकाई सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झालेली आहे, परंतु कारखाना साइटवरती पाहणी केली असता असे लक्षात येते की कारखान्याचे कर्मचारी व कारखान्याची वाहने ही माजी संचालकाच्या घरी/कार्यालयामध्ये काम करताना दिसत आहे.

तसेच काही कर्मचारी कारखान्याचे कामकाज सोडून, माजी संचालकाच्या निवडणूक प्रचाराचे काम करीत आहेत. तरी आमची आपणास विनंती आहे की, कारखान्याची वाहने आपल्या कार्यालयात जमा करावीत. तसेच कर्मचाऱ्यांना कारखान्यावरती

दररोज हजेरी लावून, कारखान्याचे काम करण्यास सांगावे. कर्मचाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिक स्वरूपात करावी व त्या कामी लागणारे बायोमेट्रिक मशीन स्वखर्चाने पुरवण्यास मी तयार आहे, अशी निवेदन निवडणूक निर्णय अधिकारी यांना सुभाष बापूराव शिंदे यांनी दिले आहे.

