
उमरडच्या शेतकऱ्याचा प्रामाणिकपणा; कांदा व्यापाऱ्यांकडून जादा आलेले पंचवीस हजार रु. केले परत
करमाळा प्रतिनिधी

उमरड(नंदकिशोर वलटे) उमरड ता. करमाळा येथील शेतकरी राजाभाऊ चोरमले यांच्या नावावर कांदा व्यापार्यांकडून पंचवीस

हजार रुपये जादा आले.ते त्यांनी प्रामाणिकपणे परत केले याचे सर्वत्र कोतुक होत आहे.कांदा व्यापारी सोमनाथ गोरख अनारसे

रा.आंबीजळगाव हे उमरड येथे येऊन कांदा खरेदी करतात त्यांनी राजेंद्र चोरमले यांचा कांदा खरेदी केला मात्र व्यापारी अनारसे

यांच्या कडून नजर चुकीने पंचवीस हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाले मात्र चोरमले यांनी ही रक्कम कांदा व्यापाऱ्याच्या घरी जाऊन परत केली.शेतकऱ्याच्या या प्रामाणिकपणाने सर्वत्र कोतुक होत आहे.
