
नेरले ते आवाटी रस्ता.
करमाळा प्रतिनिधी
नेरले ते आवाटी रस्ता गावाजवळील ब्रिजचे काम चालू आहे.ठेकेदार यांनी पाईपच्या खाली कठीण खडकापर्यंत खोदाई करून बांधकाम करणे आवश्यक होते.पाण्याचा प्रवाह पूर्व दक्षिण कोपऱ्यातून आहे आणि पाईप टाकले दक्षिण पश्चिम कोपऱ्यातून

तेही मातीवर बसवून काम सुरू केले होते.त्याबाबत आम्ही ठेकेदार यांना विनंतीकेली.नियमाप्रमाणे कठीण खडकापर्यंत खोदाई करून काम न केल्यास हा ब्रिज टिकू शकत नाही पहिल्याच पावसामध्ये हा वाहून जाईल योग्य काम करा त्यांनी सांगितले अंदाज पत्रकामध्ये खोदाई काम नाही. त्यामुळे आम्ही करू शकत नाही नंतर आम्ही करमाळ्याचे अभियंता मनोज देवकर यांना विनंती केली त्यांच्याकडून देखील असेच उत्तर देण्यात आले.त्यामुळे आम्ही सोलापूर येथे करमाळा डिव्हिजनचे

अभियंता तुळजापूरकर यांना भेटून या कामाविषयी विनंती केली.ठेकेदार यांची चूक लक्षात त्याच्या आल्यामुळे त्यांनी अभियंता देवकर यांना सूचना करून कठीण खडकापर्यंत खोदाई करून पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे पाईप बसवून मजबूत काम करण्याच आदेश दिला.त्याप्रमाणे देवकर यांनी कामाला भेट देऊन ठेकेदार यांनी चुकीचे केलेले काम मजबूत व नियमाप्रमाणे

करण्याच्या सूचना दिल्या त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला अभियंता देवकर व अभियंता तुळजापूर यांचे नेरले ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन नेरले गावामध्ये कोणतेही विकास काम होत असताना गावातील कार्यकर्त्यांनी नागरिकांनी गट तट,पार्टी फळी याचा विचार न करता काम मजबूत करून घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे कामासाठी वापरला जाणारा

निधी हा आपलाच असतो,अशी भावना प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये पाहिजे,आपण लक्ष नाही दिले तर ठेकेदार मजबूत काम करत नाहीत त्याचे उदाहरण म्हणजे नेरले ते गौंडरे रस्ता आत्ता डांबर नावाला देखील राहिले नाही त्या रस्त्याने आज पाई देखील चालत नाही व तसेच ग्रामस्थांनी लक्ष न दिल्यामुळे नेरले सोसायटीच्या सचिवांनी गावातील 125 सभासद कमी करून बाहेर जिल्ह्यातील 125 सभासद समाविष्ट करणे याचा अर्थ काही कर्मचारी, अधिकारी ,ठेकेदार,यांनी समज करून

घेतला आहे,की नेरलेमध्ये काहीकेले तरी आपले कोणीच काय करू शकत नाही त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी यासाठी सक्षम असले पाहिजे,व आपली नेरले ग्रामस्थांची शूरवीर करारीपणा अन्याय सहन न करण्याची परंपरा तसेच नेरले गावाची वेगळी असलेली ओळख कायम ठेवली पाहिजे असे।औदुंबर राजे(मा सरपंच ग्रामपंचायत नेरले) यांनी सांगितले आहे