
अहिल्याराणी होळकर यांच्या जयंतीनिमित्त धायखिंडी येथे वृक्षारोपण,पाणपोई चे उद्घाटन आणि नुतन पोलिस भरती झालेल्या पोलिस बांधवाचा जाहीर सत्कार केला
करमाळा प्रतिनिधी
राष्ट्रीय समाज पक्ष व सकल धनगर समाज आयोजित पुण्यश्लोक अहिल्याराणी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यापैकी धायखिंडी येथे वृक्षारोपण व पाणपोई चे उद्घाटन मकाई सह.सा.का. माजी

चेअरमन दिग्विजय बागल व आदिनाथ चे माजी व्हॉइस चेअरमन प्रा.शाहाजी देशमुख यांच्या प्रमुख हस्ते पार पडले. त्या नंतर दूपारच्या सत्रात नूतन पोलीस बांधवांचा आणि दहावी बारावी मधील पास विद्यार्थ्यांचा देखील सत्कार महामुनी मंगल कार्यालय धायखिंडी येथे पार पडला. या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून करमाळा तहसीलचे नायब तहसीलदार दादा गायकवाड व माजी पीएसआय अभिमन्यू उघडे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वराज अकॅडमी मधील विद्यार्थ्यी व गुणवंत्त विद्यार्थी आणि करमाळा तालुक्यातील उपस्थित 23 नुतन पोलीस भर्ती झालेल्या पोलिस बांधवांसह आई वडिलांचा

शाल,हार,फेटा,नारळ आणि राजमाता अहिल्याराणी होळकर यांची प्रतिमा देऊन सत्कार संपन्न झाला. स्वराज्य करियर अकॅडमी मधील विद्यार्थ्यांना ए.सी.पी योगेशजी मदने यांनी फोनद्वारे मार्गदर्शन केले.
या दोन्ही कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर सर,उपसभापती चिंतामणी जगताप,अँड राहुल सावंत,मनसेचे तालुका अध्यक्ष संजय बापू घोलप, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष

संतोष वारे, राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष जीवन होगले,सामाजिक कार्यकर्ते शहाजी ठोसर,रयत क्रांतीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर जगदाळे,सामाजिक कार्यकर्ते राजू कांबळे, मकाईचे नुतन संचालक बाळू आनारसे,दादा दुधे, अंकुश देवकते,गणेश पोळ, स्वराज अकॅडमीचे संस्थापक विकास गिरवले, प्राध्यापक श्रीकांत दरगुडे, डॉ. समाधान कोळेकर, शुभम बंडगर, धनगर पिठाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब टकले, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, भीम दल संघटनेचे

जिल्हाध्यक्ष पत्रकार सुनील भोसले,प्रा. नितीन देवकते, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण होगले,रासपचे नेते शंकर सुळ, प्रगतशील शेतकरी तात्या काळे, माजी सरपंच बाळराजे मोटे, जगन्नाथ सलगर,महादेव वायकुळे, सतीश मोटे,भागवत वाघमोडे,आबा टकले, आजिनाथ वायकुळे,दादा वायकुळे,अशोक वायकुळे, माजी सरपंच तुकाराम क्षिरसागर,रंगनाथ वाघमोडे समाधान

शिंगटे,विकास मेरगळ,मेजर बिरमल सलगर,सोनू खामगळ, हनुमंत गोफने इत्यादी सह कार्यकर्ते उपस्थित होते.