मकाई परिवर्तन पॅनलच्या वतीने नुतन संचालक सुभाष शिंदे आज सत्कार करण्यात आला
करमाळा प्रतिनिधी
मकाई सहकारी साखर कारखाना याचे माजी संचालक, सुभाष बापूराव शिंदे, यांची “धर्मवीर संभाजी अर्बन को-ऑप बँक लि. पुणे” च्या संचालकपदी 1570 मताधिक्याने चौथ्या क्रमांकाने, संचालक पदी निवड झाल्याबद्दल मकाई परिवर्तन पॅनल च्या
वतीने आज सत्कार करण्यात आला. त्यावेळी मकाई परिवर्तन पॅनेलचे प्रमुख प्रा. रामदास मधुकर झोळ सर यांच्यासह आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन वामनदादा बदे , तसेच सर्व मकाई परिवर्तन पॅनलचे पदाधिकारी यांनी सत्कार केला.
सदर कार्यक्रमास खालील मान्यवर आवर्जून उपस्थित होते. शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष रवींद्र गोडगे तसेच दीपक शिंदे, रामभाऊ शेळके, अमोल घुमरे, बापू फडतरे, नवनाथ नीळ, बाबाजान खान, अशोक लवंगारे, बापू वाडेकर, राजेंद्र
शेळके, तुकाराम काळे इ. मान्यवर उपस्थित होते. तसेच पोथरे येथील प्रभाकर शिंदे, हरिभाऊ जिंजाडे, किसन शिंदे, संतोष वाळुंजकर, नामदेव शिंदे, हरिभाऊ शिंदे, अशोक शिंदे, हनुमंत शिंदे, योगेश ननवरे, भीमराव वाळुंजकर, आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच वाशिंबे गावातील माजी सरपंच भगवान डोंबाळे उपस्थित होते.