
मांगी तलाव कुकडीत वर्ग करण्यासाठीच्या स्वाक्षरी अभियानास पोथरेत उत्स्फूर्त प्रतिदास :- नितीनभाऊ झिंजाडे
करमाळा प्रतिनिधी
करमाळा :-मांगी तलाव कुकडी प्रकल्पात विलीनकरण करण्यासाठीच्या स्वाक्षरी अभियानास पोथरेत उत्स्फूर्त प्रतिदास मिळत असलेची माहिती भाजपचे नितीनभाऊ झिंजाडे यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की,मांगी तलाव

कुकडी प्रकल्पात वर्ग करण्याची आमच्या लोकांची मागणी होती.भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी यासाठी विशेष लक्ष घातले असून माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून हा प्रश्न शासन दरबारी मांडला आहे.याबाबत पुणे येथे झालेल्या बैठकीसाठी पोथरे गावातून सरपंच धंनजय झिंजाडे,मकाईचे माजी संचालक

हरिभाऊ झिंजाडे, आदिनाथ चे माजी संचालक व विद्यमान सदस्य विठ्ठल शिंदे,ग्रामपंचायत सदस्य अंकुश शिंदे,शांतीलाल झिंजाडे,पाराजी शिंदे,माजी सरपंच विष्णू रंदवे, खरेदी विक्री संघांचे माजी चेरमन प्रभाकर शिंदे,संतोष वाळुंजकर, तानाजी जाधव,दीपक कडू,शहजी शिंदे,नामदेव शिंदे,राजेंद्र वाळुंजकर,धनंजय झिंजाडे,लखन झिंजाडे आदिनी खासदार निंबाळकर यांची

भेट घेऊन या प्रश्नांकडे लक्ष वेधले होते.
लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत सह्यांचे निवेदन दिले जाणार आहे.मांगी तलाव कुकडी

प्रकल्पात विलीनकरण करण्यासाठीच्या स्वाक्षरी अभियानास पोथरेसह या प्रकल्पात समाविष्ट असलेल्या 22 गावातून उत्स्फूर्त प्रतिदास मिळत आहे असे झिंजाडे यांनी सांगितले आहे.
