
करमाळा प्रतिनिधी
हिवरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरवाडी या शाळेची विद्यार्थिनी उत्कर्षा धनाजी पवार हिचा राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत जातेगांव केंद्रात प्रथम क्रमांक आला. तर समीक्षा दत्तात्रय मेरगळ हिचा दुसरा क्रमांक आला. जानेवारी 2026 मध्ये राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली होती. त्या परीक्षेचा निकाल लागला असून त्या परीक्षेमध्ये उत्कर्षा पवार हिचा जातेगांव केंद्रात प्रथम क्रमांक आला तर त्याच शाळेची समीक्षा मेरगळ हिचा दुसरा क्रमांक आला. या दोघीनाही वर्गशिक्षक वारे सरांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे मुख्याध्यापक व शाळेतील सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.



