
करमाळा प्रतिनिधी
श्री कमलादेवी मंदिराचे पुरातन दगडी स्वरूपातील असलेले मुळ मंदिराचे दर्शन भाविक भक्तांना मिळणार आहे. श्रीजगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्टच्या संयोजकाने श्रीकमलादेवी मंदिर जतन व संवर्धन कामास गेल्या वर्षापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. मंदिर जतन संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून भक्तांच्या देणगी रूपी सहकार्यातून या कामास सुरुवात करण्यात आलेली आहे.

श्री कमलादेवी मंदीर जतन संवर्धन कामास आज रविवार दिनांक २४ मे २०२६ रोजी ज्ञानदेव केशव पासंगराव रा. करमाळा, सोलापूर यांच्या कडून रोख देणगी रु.५१,१११/- (एक्कावन्न हजार एकशे अकरा फक्त) देणगी प्राप्त झाली आहे. या निमित्त श्रीजगदंब देवी देवस्थान ट्रस्ट कडून त्यांचा सत्कार मंदिर पुजारी नारायण सोरटे, व्यवस्थापक अशोक गाठे यांनी सत्कार केला आहे. यावेळी पासंगराव पुर्ण परिवार व भक्त गण उपस्थित होते.

श्रीकमलादेवी मंदिर जतन संवर्धन काम प्रगती प्रथावर असल्याकारणाने भाविकांनी सढळ हाताने देणगी देऊन या कामात सहकार्य करण्याचे आव्हान देखील श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात आले आहे.
तसेच ऑनलाईन देणगीची सुविधा उपलब्ध आहे. संपर्क अशोक गाठे. व्यवस्थापक मो.नं. ९४०४७०८९२४.
