
अपात्र उमेदवारांचा निकाल येण्या अगोदर पात्र असलेल्या चौदा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघार घेतली
करमाळा प्रतिनिधी
सध्या रामदास झोळ व सविता राजेभोसले यांच्यासह २१ अपात्र उमेदवारांबाबत अपिलातील निकाल जाहीर होण्या आगोदरच १४ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. या १४ जणांनी अपात्र उमेदवारांच्या निर्णय अगोदरच अर्ज मागे घेतल्यामुळे उलट सुलट चर्चा तालुक्यात चालू झाली आहे कि, ते कोनाच्या दबावाखाली तरी नाहीत का ? असे समजते.

या खालिल चौदा १४ जणांनी माघार घेतली आहे.
भिलारवाडी – हाके मंगल रामचंद्र

पारेवाडी – पांढरे नितीन उत्तम, निकत हनुमंत देवराव, पाटील स्वाती संतोष
चिखलठाण – इंगळे निर्मला सत्यवान, सरडे आप्पासो गनराम

वांगी – पिसाळ तुकाराम बहिरू, धोंड मनिषा सौदागर
मांगी – रोहित्र दिनेश भांडवलकर, लावंड रवींद्र अंगद, झिंजाडे हरिचंद्र आनंदा

महिला राखीव – झोळ शांता मनोहर
अनु. जाती. जमाती – गायकवाड सुष्मा ज्ञानेश्वर

भटक्या विमुक्त – चोरमले राजश्री बापू