
करमाळा प्रतिनिधी
पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे. करमाळा शहरात अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकडे झालेले आहेत सोबतच शहरातील अनेक खांबावर बिनकामाच्या तारा तुटलेल्या अवस्थेत लटकत आहे. वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस झाला तर गंभीर दुर्घटना घडू शकतात.

तरी महावितरणने या गोष्टीचे गांभीर्य ओळखून शहरातील विजेचे वेडेवाकडे पोल, बिनकामाच्या लटकनाऱ्या तारा तसेच काही ठिकाणी वाहतुकीला अडथळा ठरणारे रिकामे पोल पावसाळ्यापूर्वी तात्काळ काढावेत, अशी मागणी भाजपा व्यापार आघाडी चे शहराध्यक्ष जितेश कटारिया यांनी केली आहे.



