
करमाळा तालुक्यात 350 वा हिंदू साम्राज्यदिन उत्सवाला सुरुवात
वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी
यावर्षी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त हिंदु साम्राज्यदिन उत्सव संयोजन समितीच्या वतीने करमाळा तालुक्यात 2 जून 2023 ते 20 जून 2024 या दरम्यान वर्षभर विविध कार्यक्रम सर्व

समाजाला सोबत घेऊन साजरे करण्यात येणार आहेत. यामध्ये व्याख्यानमाला, प्रवचन कीर्तन, महाविद्यालयात कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धा, शिवकालीन वेषभूषा स्पर्धा, पोवाडे स्पर्धा, शोभायात्रा इत्यादी कार्यक्रम आहेत. अभियानाचा पहिला टप्प्या 1

जून ते 15 जून 2023 करमाळा तालुक्यातील सर्व गावातील सर्व घरापर्यंत शिवरायांच्या राज्यभिषेकाचे स्टिकर व शिववरयांच्या कार्याची माहिती असणाऱ्या पत्रकाचे वाटप होणार आहे. या अभियानाचा प्रारंभ आज करमाळा शहरातील

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते. या अभियानात सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन 350 वा हिंदु साम्राज्य दिन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
