
करमाळा तालुक्यात म. गांधी विद्यालयाचा ९३.२६ % निकाल
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील करमाळा तालुका एज्यूकेशन सोसायटीचे म. गांधी विदयालयाचा ९३.२६% निकाल लागला आहे. तालुक्यात सर्वात जास्त ३१४ विद्यार्थ्यानी बोर्ड परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ३१२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

यामध्ये २९१ विद्यार्थी उत्कृष्ट गुण मिळवत उत्तीर्ण झाले आहेत. तब्बल १२० विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथमश्रेणीत, १०३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ५२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १६ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. सर्व यशस्वी

विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. आ. जयवंतराव जगताप, विश्वस्त माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, विश्वस्त शंभूराजे जगताप, प्राचार्य पी. ए. कापले, उपप्राचार्य बागवान सर, पर्यवेक्षक एस. टी. शिंदे, बी. के. पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदिंनी अभिनंदन केले आहे.

केतकी गणेश कोरपे – गुण – ४८६/५०० – ९७.२०%, प्रणिती शिवाजी ढेरे – ४८२ / ५०० – ९६.४०%, उन्नती उत्कर्ष गांधी – ४८१/५०० – ९६.२० %, श्रध्दा भालचंद्र यादव – ४७९/५०० – ९५.८०%, विनीत निलेश विधाते – ४७७/५०० – ९५.४०% हे प्रशालेचे यशवंत विद्यार्थी आहेत.

