कानाडगल्लीत रस्त्याची दुरावस्था: पाणी येत असताना जलवाहिनी बदलली: पालिकेचा तुघलकी कारभार

करमाळा प्रतिनिधी

शहरातील कानाडगल्लीत रस्त्याची दुरावस्था झाली असुन पाणी येत असताना जलवाहिनी बदलल्याने चागंला रस्ता खराब करण्याचा पालिकेचा तुघलकी कारभार झाला आहे.

करमाळा शहरातील कानाड गल्लीमधील शाळा नंबर दोनच्या मागे करमाळा नगरपालिकेकडून गेल्या वर्षी पाणी येत असतानाही या गल्लीतील जलवाहिनी बदललेली आहे.  जलवाहिनी बदलल्याने चागंल्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे.

गेल्या वर्षापासून रस्ता दुरूस्ती पालिकेने केलेली नाही. या ठिकाणी या रस्त्यावर टाकलेले पेविंग ब्लॉक (फरशी) उखडले आहेत. या ठिकाणी घरातील धुणे-भांडी चे सर्व सांडपाणी या रस्त्यावर साठत आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी सुटून मच्छरांची पैदास मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचबरोबर वाढत्या मच्छरामुळे या भागातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गल्लीतील जलवाहिनी बदलल्याने चागंल्या रस्त्यावरील हजारो ब्लॉक निघाले आहेत.  त्या ठिकाणी

मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत. ते खड्डे करमाळा नगरपालिकेच्या बांधकाम विभागाने न बुजवल्याने तसेच  तो रस्ता दुरुस्त न केल्याने या भागात पादचाऱ्यांना पायी जाणे धोकादायक ठरले आहे. वृद्धाना तर साधे चालता येत नाही. अनेकजण पाय घसरून पडले आहेत. या रस्त्यावरून  मोटारसायकल, सायकल चालवता येत नाही. त्याचबरोबर या भागातील गटारीही नादुरुस्त झाले आहेत. उंदिर -घुशीने मोठा उकीर केल्याने गटारीत माती पडल्याने व गाळ साचल्याने गटार तुबंल्या जात

आहेत. गटारी काढल्या जात नसल्याने मोठ्या प्रमाणात  पाणी साचल्याने मच्छरचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे तात्काळ या भागातील रस्ता दुरूस्ती करावी व गटारी दुरूस्त करून स्वच्छ कराव्यात अशी मागणी या भागातील रहिवाशांनी निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनावर अलका मेरूरकर, विलास चिवटे, जिवन बरिदे, दिलीप महाजन, सलीम शेख, संजय महाजन, अकिल बागवान, महेश महाजन, प्रकाश क्षीरसागर, रोहित महाजन, अलिम शेख, इलाही आतार,रेहना आतार आदींचा समावेश आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *