भारताची शक्ती ही विविधतेत आहे. देशाची विविधता पाहण्यासाठी युवा संगम च्या माध्यमातून या राज्यातील युवक दुसऱ्या राज्यांमध्ये जाऊन तेथील संस्कृती अनुभवतात. या उपक्रमाच्या माध्यमातून बाराशे युवांनी देशाच्या 22 राज्यांमध्ये जाऊन संस्कृतीचा अभ्यास व परिचय केला आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 101 व्या मन की बात या कार्यक्रमादरम्यान देशवासीयांशी संवाद साधला करमाळा शहरातील प्रभाग क्रमांक 88 या ठिकाणी प्रसारित कार्यक्रमा वेळी भाजपा तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंखे, श्याम सिंधी, बाळासाहेब हौसिंग, आबासाहेब टापरे, नरेंद्रसिंह ठाकुर, संतोष कुलकर्णी, शिवाजी जाधव, मनोज कुलकर्णी, किशोर जाधव, दर्शन कुलकर्णी, शुभम कुलकर्णी, गणेश जाधव, राजेंद्र भोसले, अंगद देवकते, राजेंद्र सूर्यपुजारी, संजय तेली आदी उपस्थित होते.

 युवा संगम  मध्ये बिहार येथील विशाखा सिंह यांनी तामिळनाडूत जाऊन संस्कृती अनुभवली तसेच अरुणाचल प्रदेश येथील ग्यामर जी यांनी राजस्थान येथील संस्कृती अनुभवली यांच्याशी मोदीजिंनी त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला मोदीजींनी जपान हिरोशिमा येथील पीस मेमोरियल म्युझियम ला भेट दिल्यानंतर भारतामध्ये नुकतेच संपन्न झालेले इंटरनॅशनल म्युझियम एक्सपो मध्ये बाराशे पेक्षा अधिक म्युझियमच्या विशेषतः दर्शविल्या चे सांगितले. यामध्ये गुरुग्राम येथील अनोखे ‘ मिजो कॅमेर’  या सन 1860 त्यानंतरच्या आठ हजार पेक्षा जास्त कॅमेरे चे कलेक्शन या म्युझियममध्ये होते.

तसेच तामिळनाडू येथील म्युझियममध्ये दिव्यांग बांधवांना गृहीत धरून या म्युझियमची उभारणी केली आहे. तसेच मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वास्तु संग्रहालय यामध्ये 70 हजार पेक्षा अधिक संरक्षित वस्तू असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच 2010 मध्ये इंडियन मेमरी प्रोजेक्ट या ऑनलाइन म्युझियममध्ये संपूर्ण देशा मधून फोटो तसेच विविध गोष्टींचा संग्रह आहे. तसेच देशाच्या विभाजनाच्याही काही स्मृती यामध्ये दिसून येतात. मागील वर्षांमध्ये काही नवीन म्युझियमची उभारणी सुरू आहे. यामध्ये नवीन म्युझियम सुरू आहेत. प्रामुख्याने पूर्व प्रधानमंत्री पीएम म्युझियम, दिल्ली पोलीस

मेमोरियल म्युझियम, नॅशनल म्युझियम, दांडिया यात्रा ला समर्पित दांडी म्युझियम, स्टॅच्यू ऑफ युनिटी या माध्यमातून राष्ट्राचे सचित्र दर्शन यामधून दिसून येत आहे. त्याचबरोबर पाणी हे जीवन आहे हे ओळखून देशामध्ये 75 अमृत सरोवरची निर्मिती होत आहे. तसेच पन्नास हजार पेक्षा जास्त अमृतसरवर पूर्ण झालेले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे संरक्षण होणार आहे. तसेच जल संरक्षणासाठी काही स्टार्टअप ‘फ्लॉक्स  जेन’ , लिव्ह एन सेन्स ‘कुं भिकागज’ हे स्टार्टअप बाजारात आलेले आहेत. तसेच छत्तीसगड येथील काही युवक एकत्र येऊन जलसंरक्षण जागृती मोहीम प्रबोधनाच्या माध्यमातून करत

आहेत. तसेच झारखंड येथील खुंटी येथील बोरी बांध या मोहिमेमुळे पाण्याची साठवण करत आहेत. ज्याप्रमाणे 1965 च्या युद्धात लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान चा नारा दिला त्यानंतर अटलजींनी जय विज्ञान चा नारा दिला त्यानंतर मी जय अनुसंधान हा नारा देऊन कर्तुत्वांना प्रोत्साहन दिले. असेच एक क्रांतिकारी  पाऊल महाराष्ट्र येथील नाशिक मधील शिवाजी ढोले यांनी उचललेले आहे. आर्मीमध्ये रिटायर होऊन नंतर एग्रीकल्चर डिप्लोमा करून कृषी क्षेत्रात अभूतपूर्व कार्य सुरू केले. त्यांनी वीस लोकांची टीम एकत्रित करून वेंकटेश्वर सहकारी संस्था निर्माण केली. त्यांनी महाराष्ट्र व कर्नाटक मध्ये आपले कार्यक्षेत्र सुरू केले आहे आणि या माध्यमातून 18000 लोकांना जोडले आहे. यामध्ये डेरी ऑरगॅनिक फार्मिंग जल व्यवस्थापन अशा पद्धतीने शेतीचे संलग्न कामे त्यांनी सुरू केलेले आहेत. 28 मे स्वतंत्र वीर वि. दा. सावरकर यांची जयंती त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही चाललो आहोत. तसेच 4 जून संत कबीर यांची जयंती त्यांनी कुप्रथा यांना विरोध करून समाजामध्ये जागृती केली. तसेच राजकारण व सिने जगत मध्ये ज्यांनी आपला ठसा उमटवला आहे.  असे एन. टी. रामराव यांच्या 100 वी जयंती त्यांनी 300 पेक्षा जास्त चित्रपटात काम करून आपली अदाकारी दाखवली त्यांच्या जयंती निमित्त  विनम्र श्रद्धांजली अर्पण केली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *