श्री आदिनाथ साखर कारखान्यावर प्रशासकीय अधिकारी यांनी काहीच कामकाज केले नाही- मा. संचालक पुंडे

करमाळा प्रतिनिधी

श्री आदिनाथ साखर कारखान्यावर प्रशासकीय अधिकारी नेमणूक झाली त्यांनी आजून काहीच काम केले नाही सभासद वर्ग नाराज झाले आहेत अशी माहिती आदिनाथ साखर कारखान्याचे मा संचालक डॉ वसंत पुंडे यांनी दिली आहे.

आदिनाथ व मकाई साखर कारखाना करमाळा तालुका शेतकरी सभासदांची

दोन्ही कारखान्याची सध्याची परिस्थिती सभासदाने पूर्ण अभ्यास करून आपला उसाचे नियोजन करावे लागणार आहे.

आदिनाथ कारखान्यावर प्रशासक अधिकारी येऊन एक महिना होऊन गेलेला आहे. त्याने कारखाना चालू करण्याचे दृष्टीने काय काय प्रयत्न केले आहेत? येणारा सीजन चालू करण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न दिसत नाहीत. आर्थिक नियोजन शेती विभागाचे यंत्रणा, नोकर भरती, अधिकारी नेमणूक, मशीनिरीचे कामे इ. आदिनाथचे कामे काहीच चालू नाहीत. परत परत त्याच त्याच गोष्टी काही धोरण आहे? आदिनाथचे भविष्य परत अंधाराकडे जात आहे का?

मकाई कारखाना निवडणूक प्रक्रिया चालू आहे. तेथील आर्थिक परिस्थिती फार बिकट आहे व भविष्यात चालू करणे ही अवघड आहे. जबाबदार नेते मंडळी मागे हटत आहे का अशी शंका येते.

दोन्ही कारखान्याची अशी अवस्था व कमलाई, मकाई, विहाळ  कारखान्याने 23 जानेवारी पासूनचे ऊस बिल दिलेले नाहीत. ह्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करावे प्रश्न मोठे आहे. काही मार्ग लवकरात लवकर निघेल असे दिसत नाही. आदिनाथ साखर विक्रीचे काय केले. ते विकून निवडणूक खर्चासाठी भरणे. आठवड्यातून एकदा प्रशासकीय अधिकारी येतात. काय कामाचे नियोजन घेणार. सीजन बाबत नियोजन नाही. प्रशासकीय अधिकारी बाळासाहेब बेंद्रे पुणे येथे राहतात

येणे जाणे त्यांना लांब असेल..म्हणून कारखान्याचे नियोजन करणे त्यांना अवघडच आहे.तानाजी सावतांचे पैसे देणे आपले काम आहे.त्याचे नियोजन करणे. चार साडेचार हजार क्विंटल साखर आहे. साखर विकून ताबडतोब निवडणूक रक्कम भरून निवडणूक प्रक्रिया चालू करण्यासाठी काही हरकत नाही, असे अखेर मा संचालक वसंत पुंडे यांनी सांगितले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *