अर्ज अवैध ठरल्याविरोधात उच्च न्यायालयात जाणार

प्रा. रामदास झोळ ; मकाई परिवर्तन पॅनेलची घोषणा

करमाळा प्रतिनिधी

श्री मकाई सहकारी साखर कारखानाच्या निवडणुकीत आमचे उमेदवारी अर्ज जाणीवपूर्वक अवैध केले असून, याच्या विरोधात आम्ही साखर सहसंचालक, सोलापूर यांच्याकडे अपील दाखल केले आहे, जर सहसंचालकांनी आमचे अर्ज अवैध ठरवले तर आम्ही उच्च न्यायालयात जाण्याची तयारी ठेवली असल्याची माहिती मकाई बचाव समितीचे अध्यक्ष प्रा. झोळ यांनी दिली.

यावेळी बागल विरोधात लढणाऱ्या पॅनलचे नाव ठरले असून, श्री मकाई परिवर्तन पॅनेलच्या नावाखाली निवडणूक लढणार असल्याची घोषणाही यावेळी प्रा. झोळ यांनी केली.

याबाबत भिगवणचे दत्तकला शिक्षण संस्था येथे मकाई कारखान्याच्या निवडणुकीबाबत त्यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी आदिनाथ चे माजी अध्यक्ष वामनराव बदे, लालासाहेब जगताप, रवींद्र गोडगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रा. झोळ म्हणाले, उमेदवारी अर्ज भरताना जी कागदपत्र जोडली होती, ती गहाळ करून जाणीवपूर्वक छाननी दिवशी उमेदवारी अर्ज वाद केले आहेत. हे बागल गटाने जाणीवपूर्वक केले आहे. बागल गटाकडून रश्मी बागल व दिग्विजय बागल यांनी उमेदवारी अर्ज दाखल का केला नाही, याचे उत्तर आधी बागलांनी द्यावे.

यावेळी वामनराव बदे म्हणाले, बागलांना जनतेसमोर जायला तोंड नाही म्हणून त्यांनी खोटे नाट्य करून अधिकार मॅनेज करून उमेदवारी अर्ज वाद केले आहेत. हे जर खऱ्या अर्थाने सभासदांचे हित पाहत असतील तर त्यांनी कारखान्याच्या निवडणुकीला सामोरे जावे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *